मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

1035

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही बाधा होत आहे. आतापर्यंत 4 केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नीची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. नाईक यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. फारशी लक्षणे नसल्याने त्यांनी होम आइसोलेशनचा पर्याय निवडला आहे. तसेच संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

आज सकाळी नाईक यांच्या पत्नीची कोविड टेस्ट करण्यात आली होती. ती पॉझिटीव्ह आली. त्यानंतर नाईक यांनी आपला नियोजित दिल्ली दौरा रद्द करत आपल्यासह घरातील सगळ्यांची चाचणी करून घेतली. त्यात श्रीपाद नाईक पॉझिटीव्ह आढळून आले. घरातील एकूण 10 जणांची टेस्ट झाली त्यातील नाईक आणि त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दोघांनाही होम आइसोलेशनचा पर्याय स्वीकारत आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे ट्वीटद्वारे कळवले आहे.

दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या