केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटमुळे गैरसमज, सोशल मीडियावर खळबळ; जाणून घ्या काय आहे नक्की सत्य…

उत्तर प्रदेशमधील कोरोना स्थिती बिकट असून रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीय. याच संदर्भात केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी रविवारी केलेल्या एका ट्विटमुळे गैरसमज झाला आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. यानंतर त्यांना हे ट्विट डीलिट करून स्पष्टीकरणही द्यावे लागले.

जनरल व्ही. के. सिंह यांनी केलेल्या ट्विटमुळे त्यांच्या भावाला कोरोना झाल्याचा आणि त्यांना उपचारासाठी गाझियाबाद बेड मिळत नसल्याचा गैरसमज झाला. त्यांनी या ट्विटमध्ये डीएमसह अनेकांना टॅग केल्यामुळे सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील कोरोना परिस्थिती खराब असल्याची चर्चा सुरू झाली. व्हीआयपी लोकांची ही परिस्थिती असेल तर सामान्य लोकांचे काय होत असेल, अशीही चर्चा सोशल मीडियावर झोडली जावू झाली. यामुळे व्ही. के. सिंह यांना हे ट्विट डीलिट करावे लागले.

केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण

ट्विट व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी स्पष्टीकरण दिले. ‘हे ट्विट डीएम यांना फॉरवर्ड करण्यात आलेले असून याकडे लक्ष देण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. तसेच हे ट्विट हिंदीमध्ये होते. डीएम आणि सीएमनो गरजवंताची बेडची आवश्यकता पूर्ण केली आहे’, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

काँग्रेसने घेतला चिमटा

दरम्यान, सोशल मीडियावर चर्चा होऊ लागल्यानंतर युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा घेण्याची संधी सोडली नाही. केंद्रीय मंत्री असतानाही आपल्या कुटुंबासाठी ट्विटरवरून बेडसाठी मदत मागत असाल तर कल्पना करा सामान्य लोकांची काय स्थिती असेल. कृपया अधिक माहिती थेट मेसेज करून पाठवा, मी गाझियाबादजवळ एखाद्या रुग्णालयात बेड मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, असे ट्विट श्रीनिवास यांनी केले.

‘ते’ ट्विट केंद्रीय मंत्र्यांच्या भावासाठी नाही

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांच्या भावासाठी नसल्याचा खुलासा करण्यात आलेले आहे. एका व्यक्तीने आपल्या भावासाठी बेड मिळत नसल्याचा मेसेज केंद्रीय मंत्र्यांना केला होता आणि तोच मेसेज केंद्रीय मंत्र्यांनी डीएम यांना टॅग करून ट्विटरवर शेअर केला होता, अशी माहिती कुलदीप चौहान यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

vk-singh-clarification

आपली प्रतिक्रिया द्या