केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.


भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटवरून अंगडी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सुरेश अंगडी यांना 11 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. ट्विटरवर त्यांनी ही माहिती दिली होती. तसेच आपली प्रकृती सध्या स्थिर आहे, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी आपली कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या