हटके आणि ट्रेण्डी फॅशन

513

>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर

फॅशन ही गोष्ट स्त्रीचे सौंदर्य वाढविण्यात कायमच मदत करत असते. सध्या मॉडर्न जमान्यात टिपिकल न राहता हटके आणि ट्रेण्डी राहण्याकडे तरुणींचा कल दिसून आहे. त्यातही इंडो-वेस्टर्न प्रकारातील टेण्डला पसंती मिळत आहे. आपण कितीही म्हटलं, नवीन ट्रेंडस, फॅशननुसार आपला आऊटफिट ठरतो. फॅशन हे सातत्याने बदलत राहणारे एक चक्र असतं. एक मौसम येऊ घातला की, त्या मौसमासाठी नियोजन आणि त्याकरिता नवनिर्मिती सुरू झालेली असते. जुन्या विविध फॅशन ट्रेण्डमधून प्रेरणा घेऊन नव्या मौसमासाठी आधुनिक फॅशनचे ट्रेण्ड तयार केले जातात. गेल्या दशकांत विविध स्टाइल्समुळे डिझायनर्सना रंग, याबाबतीत प्रयोग करण्याकरिता नवीन प्रेरणा मिळत असते.

सध्या लोकप्रिय होणाऱ्या अनेक आधुनिक स्टाईल्स आणि डिझाइन्सची प्रेरणा पूर्वीच्या फॅशनमध्येच दडलेली असते हे फार थोडय़ा लोकांनाच माहित असते आणि मॉडर्न डिझायनर्सने आपल्या नव्या ट्रेण्डसाठी पूर्वीच्याच फॅशन ट्रेण्ड वापरल्याची काही उदाहरणे पाहू शकतो.

६०चे दशक प्रेरणादायक

१९६०च्या दशकातील विविध स्टाईल्स त्यावेळीइतक्याच आजही लोकप्रिय आहेत. शॉर्ट हेमलीने, ग्राफिक डिझाईन आणि शिफ्ट स्टाईल्स प्रकारचे ड्रेसेस हि त्यावेळची वैशिष्टये हि आजच्या मॉडर्न डिझायनर्ससाठी प्रेरणादायक ठरतात अधिक गडद रंगसंगती आणि प्रिंट व शिफ्ट प्रकारचे ड्रेसेस यांना पसंती मिळू लागली .१९५०च्या दशकात हिट झालेले फुल स्कर्ट प्रकारचे ड्रेसेस आजही लोकप्रिय झालेले आहेत. १९८०च्या दशकात हिट झालेले ब्राइट कलर्स आणि टाइट लेगिंग्ज याबरोबरच पॉवर सूट ही डिझाईन आजही लोकप्रिय आहे.

धोती साडी

ही साडी पारंपरिक ड्रेसेसची चौकट मोडून नवा लुक देते. इंडो-वेस्टर्न लूक असणारी ही साडी हिंदुस्थानी परंपरेला साजेशी अशी आहे. नऊवारी लुक असलेली ही मॉडर्न साडी लग्नात, पार्टीजमध्ये पाहायला मिळते. हटके लुकसाठी धोती साडीवर ब्लाऊजऐवजी क्रॉप टॉप घालता येतो.

झिरमिळ्यांची फॅशन

झिरमिळ्यांची फॅशन हे प्रचंड भन्नाट असं प्रकरण आहे. सत्तरच्या दशकातील लेदर जॅकेट्सपुरती मर्यादित असलेली ही फॅशन आता स्कर्ट, स्वेटर्स आणि वेस्टर्न ड्रेस मध्ये देखील पाहायला मिळत आहे.बॅग्ज, टॉप्स, टी-शर्ट्स आणि कानातले यांतही झिरमिळ्या दिसू लागल्या आहेत.

जॅकेट्स

लाँग अफगाण श्रग्ज अफगाण श्रग्ज म्हणजे लांबीने जास्त असलेलं जॅकेट्स सध्या पाहायला मिळते. प्रिंटेड शॉर्ट श्रग्ज अगदी फ्लोरल प्रिंटपासून ते ऍनिमल प्रिंटपर्यंत अनेक डिझाइन्स या प्रकारच्या श्रग्जमध्ये पाहायला मिळतात. ड्रेसप्रमाणे लांब असलेला, पायापर्यंत येणारा अफगाण श्रग पेन्सील फिटींग पँटवर क्रॉप टॉप वर पहायला मिळतो. सध्या लाँग जॅकेटची फॅशन जबरदस्त लोकप्रिय होताना दिसतेय. जीन्सवर शॉर्ट किंवा गुडघ्यापर्यंतचं जॅकेट बर्यापैकी घातले जातात. घागरा किंवा अनारकलीवर हे जॅकेट शोभून दिसतातच, त्याचबरोबर टाइट जीन्स, पलाझो, वनपीस किंवा ट्राउझर अशा वेस्टर्न आउटफिटवरही पारंपरिक डिझाइन असलेले जॅकेट जास्त छान दिसतात.

गोंडेदार फॅशन

रंगीबेरंगी गोंडा असलेले राजस्थानी कुर्ते आणि टॉप सध्या तरुणींच्या विशेष आवडीचा विषय असलेले दिसतात. साडय़ांप्रमाणेच टॉप्स, कुर्त्यांना गोंडे पाहाला मिळतात. प्लेन टॉप्सवर गोंडे विशेष लक्षवेधक ठरतात. सुती आणि मिक्स कॉटन प्रकारातही हे टॉप उपलब्ध आहेत.

स्मार्ट स्कर्ट

सध्या आकर्षक डिझाईंन आणि विविध रंगांमध्ये स्कर्ट उपलब्ध आहेत. यामध्ये डेनिम लाँग-शॉर्ट स्कर्ट आणि कॉटन लाँग-शॉर्ट स्कर्ट, फ्रिल्स् कट यांसारख्या स्कर्टस्ला जास्त मागणी दिसून येत आहे. लाँग स्कर्ट, ए-लाईन स्कर्ट, पेन्सिल स्कर्ट यांसारखे प्रकार सध्या पाहायला मिळतात.

आपली प्रतिक्रिया द्या