
खेळ, गाणे, वक्तृत्त्व, अशा विविध तऱ्हेच्या स्पर्धांचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. काही स्पर्धा मात्र वैशिष्ट्यपूर्ण असू शकतात. अशीच वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा उत्तर प्रदेशातील देवघर गावात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिंकून आल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला पुरस्कारही मिळाला.
देवघर येथील मेधा डेयरीतर्फे ‘दही खा बक्षीस जिंका’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 250 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्त्री, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार होती. प्रत्येक गटात 10-10 जणांची विभागणी करण्यात आली होती. स्पर्धेला सुरुवात होताच प्रत्येक स्पर्धकाने 500 किलो दही खायला देण्यात आले होते. स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला दही खाण्याकरिता फक्त 3 मिनिटाचा कालावधी देण्यात आला होता.
‘दही खा बक्षीस जिंका’ या स्पर्धेत भाग घेतलेल्या पुरण राय स्पर्धकाने 3 किलो 244 ग्रॅम अवघ्या 3 मिनिटात खाल्ले. ज्येष्ठ नागरिक गटात कमीत कमी वेळात जास्त दही खाल्ल्यामुळे त्यांचा ‘दही भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, तर महिला गटात 2 किलो 376 ग्रॅम दही खाणाऱ्या 44 वर्षीय स्पर्धक मीणा देवी यांचा दह्याचे विविध पदार्थ देऊन प्रथम क्रमांक देण्यात आला, तसेच पुरुष गटात 2 किलो 960 ग्रॅम दही खाणाऱ्या भरत प्रसाद चौधरी (46) ‘दही सम्राट’ पुरस्काराने करण्यात आला.
या स्पर्धेदरम्यान झारखंड मिल्क फेडरेशन प्लांट हब इंचार्ज मिलन मिश्रा यांनी सांगितले की, ग्राहकांची दुग्धजन्य उत्पादने खाण्याविषयीची आवड वाढीस लागणे, तसेच दैनंदिन जीवनात दूध, दही या पदार्थांविषयी जागरुकता निर्माण करणे, हा या स्पर्धेमागचा उद्देश होता. स्पर्धेवेळी वैद्यकीय पथकाचे आयोजनही करण्यात आले होते.