अजब प्रेम की गजब कहानी! 19 वर्षाच्या मुलाचे 56 वर्षाच्या महिलेशी लग्न!

प्रेमात वयाचे बंधन नसते, हे आपण अनेकदा ऐकले असेल. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. किशोरवयीन मुलगा आणि 56 वर्षीय महिलेची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. या जोडप्याने नुकताच साखरपुडा केला असून लवकरच लग्न करण्याचा विचार आहे. हा मुलगा 10 वर्षांचा असताना त्या महिलेला पहिल्यांदा भेटला होता. वयात 37 वर्षांचा मोठा फरक असूनही दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. त्यानंतर ते नातेसंबंधात आले. व महिलेचा घटस्फोट झाला असून तिला तीन मुले आहेत. ज्यांचे वय सुमारे 30 वर्षे आहे, तर तिच्या प्रियकराचे वय केवळ 19 वर्षे आहे.

हे प्रकरण थायलंडच्या नाखोन प्रांतातील आहे. वुथिचाई चंत्रज (19) आणि जानला नमुआंग्राक (56) एकमेकांच्या शेजारी राहत होते. जानला घटस्फोटित होऊन एकटीच राहत होती. त्यामुळे घरातील कामात मदत करण्यासाठी ती वुथीचाईला तिच्या घरी बोलावत असे. घरकामात मदत करत असताना जानला आणि वुथीचाय यांची घट्ट मैत्री झाली. आता तर त्यांच्या नात्यालाही दोन वर्षे देखील पूर्ण झाली आहेत. ते शहरातील प्रसिद्ध ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये डेटवर जातात. या जोडप्याने सांगितले की, वयातील 37 वर्षांच्या फरकाने त्यांना काही फरक पडत नाही. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेताना आणि हात धरण्यातही या दोघांना लाज वाटत नाही.

रिलेशनशिपबद्दल बोलताना वुथीचाई म्हणाला- मी आणि जनाला 2 वर्षांपासूनसोबत आहोत. माझ्या आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे की मला कोणाचे जीवन सुखकर करावेसे वाटते आहे. ती खूप मेहनती आणि प्रामाणिक आहे. मला त्या खूप आवडतात. जानला घटस्फोटित आहे. त्या 20 वर्षांपासून तिच्या आधीच्या पतीसोबत राहत होती. दोघांना तीन मुले आहेत. जानलाच्या मुलांचे वय सुमारे 30 वर्षे आहे.

जनाला म्हणाली- वुथीचाई माझ्यासाठी सुपरहिरोसारखा आहे. तो मला माझ्या कामात रोज मदत करतो. तो जसा मोठा झाल्या तशा आमच्यात भावना निर्माण झाल्या. जेव्हा आम्ही आमच्या प्रेमाबद्दल इतरांना सांगतो तेव्हा त्यांना वाटते की आम्ही वेडे आहोत. जनाला पुढे म्हणाली, जेव्हा मी माझ्या मुलांना आमच्या नात्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. पण वुथीचाई मला तरुण असल्याचे वागवतो. आम्ही आनंदी आहोत. आम्ही लग्न करणार आहोत.