विनाकारण घराबाहेर पडले; पोलिसांनी अनोखी शिक्षा देत ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ असा बिंबवला संदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या राज्यात सर्वत्र लॉकडाऊनचे कडक निर्बंध पाळण्यात येत आहेत. लॉकडाऊनबाबत नागरिकांकडून नियमांचे पालन व्हावे याकरिता पोलीसही सर्वांवर करडी नजर ठेवून आहेत. मात्र,  एका गावातील दोन तरुण नियमांचे पालन न करता रस्त्यावर विनाकारण फिरताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अनोखी शिक्षा देत त्यांच्या मनावर ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ हा संदेश बिंबवाला. या शिक्षेचा व्हिडियो सर्वत्र व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशातील सिधी गावात संचारबंदीच्या काळात दोन तरुण कोरोना नियमांचे पालन न करता रस्त्यावर विनाकारण फिरताना पोलिसांना आढळले. सिधी गावातील पोलीस अधिकारी भगवत प्रसाद पांडे यांनी या तरुणांना समजावले आणि त्यांना अनोखी शिक्षा फर्मावली. या शिक्षेची गावात सर्वत्र चर्चा सुरू आहे. पोलीस अधिकारी भगवत प्रसाद पांडे यांनी या तरुणांना वहीतील सर्व पानांवर ‘घरी राहा सुरक्षित राहा’, असे लिहिण्याची शिक्षा केली. हे दोघे तरुण 4 तास वहीच्या 44 पानांवर हे वाक्य लिहित होती.

पोलीस अधिकारी भगवत प्रसाद पांडे सोशल मिडियावर चर्चेत असतात. लॉकडाऊनच्या काळातील त्यांच्या कामाचे बरेच व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. 30 एप्रिल रोजी या मुलांना शिक्षा केल्याचा व्हिडियोही त्यांनी यूट्यूबवर प्रसिद्ध केला होता. 1 लाखांहून जास्त लोकांनी त्याला लाईक केले.

आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनीही त्यांच्या कामातील योगदानाबाबत कौतुक केले आहे. ट्विटरवरही हा व्हिडियो प्रसिद्ध झाला असून ‘मुलांना मारण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगण्याची ही पद्धत चांगली आहे’, ‘प्रेमाने काम होत असेल तर शिक्षेची गरज नाही’, अशी प्रतिक्रिया युझर्सनी या व्हिडियोवर दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या