लंपटाचा विचित्र प्रकार, आजीबाईंच्या खोलीत लावला रेकॉर्डर

लंडनच्या बर्मिंघममध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. महिलेच्या बेडरुममधले आवाज ऐकण्यासाठी एका शेजाऱ्याने असे काही केले की त्याच्या कृत्याने सगळेच हैराण झाले. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पंधरा आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

द सनच्या वृत्तानुसार, विल्यम्स नोलान आणि ली जोन्स गेली तीस वर्षे एकमेकांचे शेजारी आहेत. चांगल्या परिचयाचे असल्याने 64 वर्षीय ली जोन्स या महिलेने विल्यम्सला आपल्या घराची चावी देऊन ठेवली होती. आपण घरात नसताना विल्यम्स पाळीव मांजरींची काळजी घेईल असं वाटल्याने ली जोन्स तिने चावी दिली होती. जोन्सचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता. मात्र त्याने विश्वासघात केला होता.

ली जोन्स एक दिवस घराची सफाई करताना तिला पलंगाच्या वरच्या बाजूला व्हॉईस रेकॉर्डर लावलेला दिसला. हा काहीतरी विचित्र प्रकार असल्याचं ली जोन्सला कळालं. तिने गुन्हेगाराला पकडण्यासाठी बेडच्या समोरच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लावला. आरोपी रेकॉर्डर न्यायला येईल तेव्हा त्याची दृश्ये टीपली जातील असं ली जोन्सला वाटल्याने तिने हा सीसीटीव्ही लावला होता. एकेदिवशी ली जोन्स बाहेर गेली असताना विल्यम्स गुपचूप तिच्या घरात रेकॉर्डर घ्यायला घरात शिरला.

चौकशीदरम्यान कळालं की विल्यम्सने हा सातत्याने ‘ली’वर नजर ठेवून होता. ली जोन्स वेडरूममध्ये जे काही बोलायची ते टीपण्यासाठी विल्यम्सने हा ऑडिरो रेकॉर्डर तिच्या बेडरूममध्ये लावला होता. विल्यम्सला रंगेहाथ पकडल्यानंतर ‘ली’ने पोलिसांत याबाबतची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी विल्यम्सला अटक केली. 25 मे रोजी बर्मिंघममधल्या न्यायालयाने विल्यम्सला शिक्षा ठोठावली. कोणत्याही व्यक्तीवर अशाप्रकारे पाळत टेवणे हा गंभीर अपराध असल्याचं म्हणत न्यायाधीशांनी विल्यम्सला पंधरा आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या