एक नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेजचे शैक्षणिक वर्ष; उन्हाळ्याच्या, हिवाळ्याच्या सुट्या रद्द

प्रातिनिधीक फोटो

विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. 1 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवावी असे आदेश आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत.


केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, युजीसीने समितीचा अहवाल स्विकारला आहे. त्यानुसार 2020-21 साठी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी वर्ष बदलण्यात आले आहे.

जर परीक्षाचा निकाल उशीरा लागला तर 18 नोव्हेंबरपर्यंत कॉलेजस सुरू करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. तसेच शिक्षणाची प्रक्रिया ऑनलाई आणि ऑफलाईन ठेवण्यास आयोगाने परवागनी दिली आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्च्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात प्रवेश रद्द केल्यास, मायग्रेशनच्या स्थितीत 30 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क परत केले जाईल असेही शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या