अदभुत! 160 कोटी वर्षांपूर्वीचे पाणी मिळाले

जगातील सर्वात जुन्या पाण्याचा शोध लागला आहे. विश्वास बसणार नाही, पण हे पाणी चक्क 160 कोटी वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. टोरँटो विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ बार्बरा शेरकूड लोलर यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. सध्या हे पाणी ओटाकाच्या कॅनडा सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे.

संशोधकांनी ओंटारियाजकळील टिमिन्स नाकाच्या भागात असणाऱया खाणीमधील हे पाणी जमा केले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात तपासणीसाठी पाठवले. या पाण्याला एक विशिष्ट कास येत होता. तसेच याची चव समुद्रातील पाण्यापेक्षा 10 पट खारट आहे. या पाण्यामुळे सूर्यमालेतील अन्य ग्रहांकर जीवन होते की नाही, याचा तपास लाकता येऊ शकतो, असे संशोधक बार्बरा यांनी सांगितले. 160 कोटी वर्षांपूर्वीच्या पाण्याचा रंग पिवळसर असून या पाण्यात इंजिनियम नावाचे तत्त्क आढळले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या