काँग्रेस उमेदवारावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न,नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा

सामना ऑनलाईन, नागपूर

गृहमंत्रालयाचाही कारभार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे काढणारी घटना घडली आहे. काँग्रेसच्या उमेदवार कुंदा खोब्रागडे यांच्या घरावर १० त १२ अज्ञात हल्लेखोरांनी रॉड आणि तलवारीने हल्ला केला. हल्ल्यानंतर त्यांनी घराशेजारी असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली.

सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे जर मुख्यमंत्र्यांचं शहरच सुरक्षित नसेल तर मग उर्वरीत महाराष्ट्राचे काय असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. कुंदा खोब्रागडे या प्रभाग क्रमांक ६ मधून काँग्रेसच्या तिकीटावरह निवडणूक लढवित आहेत. प्रचार संपवून कुंदा खोब्रागड़े आणि त्यांचे काही कार्यकर्ते घराबाहेर बसले होते. यावेळी त्यांना लांबूनच हल्लेखोर येताना दिसले, त्यामुळे कुंदा खोब्रागडे आणि अन्य महिला घरात गेल्या आणि त्यांनी दार लावून घेतलं. इतर पुरूष कार्यकर्ते घराबाहेरच उभे होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ३ जण जखमी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या