
विना परवाना पिस्तूल बाळगणाऱ्या व्यापाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल, चार काडतुसे, सोन्याचे दागिने असा सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अनिलकुमार उपाध्याय (47, रा. गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी रेल्वे पोलीस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका व्यक्तिला संशयितरित्या घाईघाईने जाताना पोलिसांनी पाहिले. त्याला अडवून विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या पिशवीत पिस्तूल, चार काडतुसे असा शस्त्रसाठा आढळून आला. त्याच्याकडे पिस्तूल परवाना नसल्याने, पोलिसांनी आरोपी अनिल कुमारला अटक केली. चौकशीत त्याने कापड व्यावसायिक असल्याचे सांगितले. ताब्यात असलेले पिस्तूल कोणी दिले, त्याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.