आयआयटी मुंबईचे मानवरहित वाहन जगात अव्वल

14

सामना ऑनलाईन, मुंबई

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी बनवलेले ‘सेड्रिका’ हे मानवरहित वाहन जगात अव्वल ठरले आहे. २५व्या ‘इंटेलिजन्स ग्राऊंड व्हेइकल’ स्पर्धेत या वाहनाने पहिला क्रमांक पटकावला. अमेरिकेच्या मिशिगन येथे ओकलँड विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केली होती. पाच देशांमधील २९ टीम त्यात सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत आयआयटीच्या ‘सेड्रिका’ला ९६ पैकी ८८ पॉइंट मिळाले. जपानच्या वाहनालाही ‘सेड्रिका’ने मागे टाकले. जपानच्या टीमला फक्त ३२ पॉइंट मिळाले. इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग विभागातील प्राध्यापक एस. एन. मर्चंट आणि मेकॅनिकल इंजिनीयरिंग विभागातील प्राध्यापक रमेश सिंग यांच्या नेतृत्वाखालील आयआयटीचे पथक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या