दिल्ली डायरी – अविवाहितांचे ‘भाग्य’…

44

>>निलेश कुलकर्णी

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा मोलाचा वाटा असतो असेही म्हटले जाते. मात्र सध्या भाजपच्या वतीने ज्या पद्धतीने ‘अविवाहित मंडळा’ला ‘अच्छे दिन’ येत आहेत आणि एकापाठोपाठ एक अविवाहित मुख्यमंत्रीपदाच्या बोहल्यावर चढत आहेत ते पाहता अनेक इच्छुकांना ‘नको तो कौटुंबिक पाश’ असेच कदाचित वाटत असेल! जयललितांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक हे दोघे सध्या देशात बिगर भाजप अविवाहित मुख्यमंत्री आहेत. भाजपकडून मनोहरलाल खट्टर हे पूर्णवेळ कार्यकर्ते मोदींबरोबरच्या मैत्रीमुळे हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदी बसले. त्यांच्याविरोधातील असंतोष पाहता ते किती दिवस टिकतील हा प्रश्न असला तरी अविवाहिताच्या रूपात मुख्यमंत्रीपदावर बसणारे ‘आद्यपुरुष’ असा त्यांचा उल्लेख करावा लागेल.

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालही अविवाहित आहेत. मणिपूरचे नवनियुक्त मुख्यमंत्री बिरेन सिंग आणि उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हेदेखील लग्नाच्या बेडीत न अडकता थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. भाजपमध्ये तसा अविवाहितांचा इतिहास मोठा ‘देदीप्यमान’ आहे. अटलबिहारी वाजपेयी ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असा हा प्रवास आहे. विद्यमान पंतप्रधानांनी सर्वसंगपरित्याग करून देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. अनेकांचा लग्नानंतर भाग्योदय वगैरे होतो. मात्र लग्नाशिवाय इतक्या वेगाने भाग्योदय होत असल्याचे पाहून अनेकजण या ‘अविवाहित क्लब’मध्ये सामील होण्याची शक्यता आहे!

आपली प्रतिक्रिया द्या