उन्नाव- तरुणीने फेकलं तरुणाच्या चेहऱ्यावर अॅसिड

461

महिलांवरील अत्याचारांमुळे कुख्यात झालेल्या उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका तरुणीने एका तरुणाच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उन्नाव येथील भवानी गंज परिसरात ही घटना घडली. पीडित तरुण आणि तरुणी एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यामुळे ते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सोमवारी तरुणीने या तरुणावर अॅसिड हल्ला केला. या तरुणाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तरुणीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या