#Unnao योगी आदित्यनाथ येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, पीडितेच्या कुटुंबीयांचा इशारा

1102

उन्नाव येथे सामूहिक बलात्कारानंतर जिवंत जाळलेल्या पीडित तरुणीने शुक्रवारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शनिवारी रात्री पीडितेचा मृतदेह दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून तिच्या मूळ गावी उन्नाव येथे आणण्यात आला. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेटायला येणार नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत असा इशारा दिला आहे.


पीडितेच्या कुटुंबीयांनी योगी आदित्यनाथ यांनी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी योगी आदित्यनाथ यांनी त्यांची भेट घ्यावी व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे आश्वासन द्यावे अशी मागणी केली आहे. शनिवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांनी शनिवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यांचा गेल्या वर्षभरापासून छळ सुरू असल्याचे सांगितले. ‘पीडितेवर बलात्कार करणारे हे भाजपशी संबंधित आहेत’, असा संशय यावेळी प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या