Live – कोकण, नगर, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस; शेतीचे नुकसान

514

देशभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलेला असतानाच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे आणखी एक संकट ठाकले आहे. महाराष्ट्रातील नगर, नाशिक व पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात जात आहे.

 • रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण,संगमेश्वरसह देवरूख परिसरात पावसाने हजेरी लावली.सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पावसाचे आगमन झाले.लॉगडाऊनमुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना पावसात भिजत त्यांचे कर्तव्य बजावावे लागले
  rain-ratnagiri-1
 • कोल्हार परिसरात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस

kolhar

 • श्रीरामपूर शहर व परिसरात पाऊस सुरू झाला आहे
 • संगमनेर शहर व तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.
 • राहाता परिसरात पाऊस सुरु आहे.
 • शाहूवाडी, मलकापूरमध्ये जोरदार पाऊस
 • नगरमध्ये ढगाळ वातावरण, जोरदार वारे

nagar-rain

 • सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मांगले परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला
 • श्रीगोंदयात अवकाळी पाऊस, गहू,कांदा ,हरबरा काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान
 • पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
आपली प्रतिक्रिया द्या