चंद्रपुरात गारांचा पाऊस

चंद्रपुर जिल्ह्यात काल सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र आज अवकाळी पावसाने गारपीट झाली. जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात आज गारांचा पाऊस पडला. या पावसाने रब्बीच्या हंगामातील हाताशी आलेलं पीक या अवकाळी पावसाने हिरावून घेतलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. सुलतानी संकटा पाठोपाठ अस्मानी संकटामुळे शेतकरी घाबरला आहे. दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेलेल्या महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे या नुकसानीचे पंचनामे करायलाही कोणी नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.