लातूर-पंढरपूरसह राज्यात अवकाळी सरी, गारपीटीमुळे शेतकरी संकटात

34
सामना ऑनलाईन । लातूर

महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसानं धुमाकुळ घातला असून सोलापूर, लातूर, पंढरपूरसह अनेक भागाला याचा फटका बसला आहे. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील काही भागात गारपीटीमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हाती आलेले पीक नष्ट होण्याची चिंता सतावत आहे.

garpit
फोटो: सुनील उंबरे

पंढरपूर शहरासह जिल्ह्यात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी हलक्या सरी बरसल्या त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली मात्र दुपारनंतर वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील कांही भागांमध्ये गारपीटही झाली.

लातूर शहर आणि जिल्ह्यात दुपारनंतर थेट पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जवळपास तासभर पावसाचा जोर कायम होता. या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा यासारखी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. आंब्यावरही पावसाचा विपरित परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

औसा तालूक्यातील तावशी, वांगजी शिवारात प्रचंड गारपीट झाली. औसा शहरात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे.

पाहा व्हिडिओ:

(व्हिडिओ: सुनील उंबरे)

आपली प्रतिक्रिया द्या