निष्काळजीपणा केल्यास फटके पडतील, योगींचा अधिकाऱ्यांना इशारा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घतले आहे. उत्तरप्रदेशमधील तरुणांच्या भवितव्यासोबत खेळणाऱ्या, कामात हलगर्जीपणा व मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जागा आता जेलमध्ये असेल, तसेच त्यांची संपत्ती देखील जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा योगींनी लखनौमधील प्रचारसभेदरम्यान दिला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाने लावलेल्या निर्बंधाविषयी देखील विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी माझ्यावर बजरंगबलीच्या नावावरून निर्बंध लावले. मात्र याच दरम्यान मी भगवान बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतले. बजरंगबलीच्या कृपेने जातिवाद, विरोधकांची एकजूट, भष्टाचार, अराजकता अशी सर्व संकटं दूर झाली आहेत. भाजपला उत्तर प्रदेशात 74 पेक्षा जास्त जागा मिळतील, तसेच देशभरात 400 पेक्षा जास्त जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला.