रक्षाबंधनाच्या दिवशी चुलत भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

932

देशभरात बहिण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव रक्षाबंधन साजरा होत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चुलत भावाने 16 वर्षाच्या अल्पवयीन बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशी बलात्कार केला. पीडितेने याबद्दल काकांना सांगताच त्यांनी तिलाच दोषी ठरवले. यामुळे निराश झालेल्या मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कानपूर येथील बिठूर येथे पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते. गुरुवारी रक्षाबंधन असल्याने तिची आई माहेरी गेली होती. यामुळे मुलगी व तिचा चुलत भाऊ घरात एकटेच होते. चुलत भावाची तिच्यावर वाईट नजर होती. घरात कोणीच नसल्याचे बघून त्याने आंघोळीला जात असल्याचा बनाव केला. त्यानंतर त्याने साबण विसरल्याचे सांगत बहिणीला साबण आणायला सांगितले. ती त्याला साबण देत असतानाच त्याने तिला बाथरुममध्ये खेचले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला. हे कृत्य करताना आरोपी दारुच्या नशेत होता. असे सांगितले जात आहे.

पीडितेने याबद्दल काकांना सांगताच त्यांनी तिलाच दोषी ठरवले. यामुळे निराश झालेल्या मुलीने रात्री घरात सगळेजण झोपले असताना आपल्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या घरातल्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याने मुलीचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या