उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये देशाला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. सरकारी शाळेतील शिपायाने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. सदर प्रकार पीडिता पाच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर उघड झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री शौचास गेली असता आरोपी पंकज आणि अमित यांनी तिला पकडले आणि एका बंद खोलीमध्ये घेऊन गेले. त्यानंतर अमितने पीडितेवर बलात्कार केला तर पंकज घराबाहेर उभा होता. तसेच आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने कुटुबियांना याबद्दल सांगितले नाही. मात्र पीडित मुलगी जेव्हा पाच महिन्यांची गर्भवती राहिली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या कुटुंबियांनी तत्काळ आरोपी पंकज आणि अमित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत FIR दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.