उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएम घोटाळा – मायावती

37

सामना ऑनलाईन । लखनऊ

उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विधानसभेत बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. निवडणुकीत समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष (बसप) यांची दाणादाण उडाली आहे. मात्र निवडणुकीचा हा निकाल म्हणजे एक मोठा ईव्हीएम घोटाळाच आहे; असा आरोप उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे.

भाजपची भूमिका जगजाहीर आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम बहुल भागात भाजपला मोठ्या प्रमाणावर मतं मिळाल्याचा पक्षाचा अहवाल सांगतो. हे फक्त ईव्हीएम घोटाळा करुन घडवून आणले असल्याचा आरोप मायावती यांनी केला. भाजप ऐवजी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत दिले तरी मतमोजणीवेळी ते मत भाजप उमेदवाराच्या खात्यात दिसावे अथवा कोणतेही बटण दाबले तरी मत भाजपच्याच उमेदवाराला मिळेल अशा स्वरुपाचा काहीतरी मोठा ईव्हीएम घोटाळा करण्यात आल्याचं मायावती म्हणाल्या. महाराष्ट्रात अलिकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीतही ईव्हीएम घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मायावती यांनी केला.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा करुन भाजपने निकाल स्वतःच्या बाजूने फिरवला असल्याचा आरोप मायावती यांनी केला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत मायावती यांनी दोन्ही राज्यांच्या विधानसभेसाठी नव्याने मतपत्रिकेवर शिक्के मारण्याच्या पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या