भर बाजारात पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक, गुन्हा दाखल

504

उत्तर प्रदेशमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला बाजारातच तिहेरी तलाक दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात शाहनाझ बेगम या महिलेचे फक्रुद्दिन या व्यक्तीशी 2011 साली लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच फक्रुद्दीनने शाहनाझचा छळ करायला सुरूवात केली. तिच्याकडून हुंड्याची मागणीही केली होती. जेव्हा पत्नीने हुंडा आणण्यास नकार दिला  तेव्हा फक्रुद्दिनने तिला मारहाण केली. बर्‍याच वेळी फक्रुद्दिन घराबाहेर पडायचा आणि महिनोनमहिने परतायचा.

असाच फक्रुद्दिन एकदा बाहेर पडला आणि अनेक दिवस परतला नाही. शेवटी पत्नी शाहनाझ आपल्या माहेरी परतली. बकरी ईदसाठी शाहनाझ आपल्या भावासोबत बाजारात गेली. तेव्हा तिचा पती फक्रुद्दिन तिथे आला आणि तिच्यावर ओरडायला लागला आणि तिथेच बाजारात तिला तलाक तलाक तलाक म्हणत तिहेरी तलाक दिला आणि निघून गेला. सणाच्या दिवशी शाहनाझने वाट पाहिली. नंतर पोलिसांकडे जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही नवीन कायद्यानुसार फक्रुद्दिनविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या