जेवण वाढताना भीक मागणाऱ्या तरुणीच्या पडला प्रेमात, लग्नही केल्याने सोशल मीडियावर चर्चा जोमात

6873

लॉकडाऊन काळात अनेक चित्रविचित्र घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील कानपुर येथे पाहायला मिळाली. येथे लॉकडाऊन काळात जेवण वाढताना एक तरुण फुटपाथवर भीक मागून खाणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्नही केले. या लग्नाला अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टनसिंग आणि लॉकडाऊन नियमांचे पालन करून हे लग्न पार पडले. सध्या या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोमात सुरू आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, गरिबीमुळे फुटपाथवर राहून पोटाची भूक भागवणाऱ्या निलमचे आयुष्य लॉकडाऊनमुळे बदलून गेले. लॉकडाऊन काळात रस्त्यावरील लोकांना जेवण वाटणाऱ्या अनिलचे नीलमवर प्रेम जडले आणि दोघांनी लग्न केले.

निलमच्या वडिलांचे निधन झाले असून आईला अर्धनवायू आहे. भाऊ आणि वहिनीने मारहाण करून घरातून बाहेर हाकलून दिले. त्यामुळे कोणताही पर्याय समोर न दिसल्याने लॉकडाऊन काळात रस्त्यावरील भिकाऱ्यांच्या रांगेत नीलम बसू लागली. या लोकांना जेवण देण्यासाठी अनिल आपल्या मालकसोबत रोज येऊ लागला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

अनिल एका प्रॉपर्टी डीलर लालता प्रसाद यांच्याकडे ड्रायव्हरचे काम करतो. तो आई-वडील, भावांसोबत राहतो. तर नीलम रस्त्यावर मागून खाते. त्यामुळे दोघांचे लग्न होईल असे कोणालाही वाटले नाही. मात्र लालता प्रसाद यांनी दोघांच्या भावना ओळखल्या आणि दोघांचे लग्न लावून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या