धर्मपरिवर्तनाच्या प्रकरणामध्ये कुलदीप यादवला अटक

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये धर्मपरिवर्तनाच्या प्रकरणात कुलदीप यादवला अटक करण्यात आली आहे. कुलदीप गरिब लोकांना हेरायचा आणि त्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मपरिवर्तन करायचा. पोलिसांनी कुलदीपला महाराजगंज जिल्ह्यातील लोहिया नगर येथून अटक केली. त्याच्याविरोधात 419,420,295ए कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराजगंज येथे श्रीमती प्रभावती देवी मेमोरियल संस्थान येथे काही लोक ख्रिश्चन धर्मातील चमत्कारची बतावणी करून आणि व्हिडीओ साहित्य विकून धर्म परिवर्तनाचे काम करत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. याची दखल घेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ख्रिश्चन धर्माचा प्रसारसंबंधीत पुस्तके आणि इतर प्रचारसाहित्य जप्त केले.

श्रीमती प्रभावती देवी मेमोरियल या संस्थेमध्ये काम करणारे व्यक्ती अन्य धर्मांवर टीका करून ख्रिश्चन धर्मा कसा चांगला आणि चमस्कारीक आहे हे सांगत आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी उकसावत होते. या संस्थेने रविवारी 12 लोकांना धर्म परिवर्तन करण्यासाठी बोलावले होते. परंतु पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत धर्मपरिवर्तनाचे साहित्य जप्त केले आणि आरोपी व्यक्तीविरोधात फसवणूक, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. या संस्थेसाठी काम करणाऱ्या अन्य लोकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.