दारूची दुकाने उघडण्याच्या परवानगीसाठी व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र

alcohol-new-study-report

उत्तरप्रदेशमध्ये वाढत्या कोरोना संसंर्गामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमात 17 मे च्या पहाटेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये दारूचे व्यावसायिक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी लागू करण्यात आलेल्या नियमादरम्यान दारूची दुकाने खुली करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीले आहे. दारू व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दारूची दुकाने बंद असल्याने दररोज 100 कोटी पेक्षा जास्त नुकसान होत असल्याची माहिती दिली. तसेच दारूची दुकाने खुली करण्यासाठी सरकारने परवानगी देण्याची विनंती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश सरकारने कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात दारूची दुकाने सुद्धा बंद आहेत. दारूची दुकाने असणाऱ्या व्यावसायिकांनी दारूची दुकाने खुली करण्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. मद्य विक्री वेल्फेअर असोसिएशन उत्तरप्रदेशच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

असोसिएशनचे प्रदेश अधिकारी कन्हैयाला मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीमुळे दारूची दुकाने बंद आहेत. दारूची दुकाने बंद ठेवण्यासंदर्भात सरकारकडून निघालेल्या आदेशात कोणताही उल्लेख केला गेला नाही. तसेच अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परवानाधारक दुकानदारांना दुकान बंद करण्यासाठी आदेश मिळाला नाही, असे म्हटले आहे.

तसेच त्यांनी म्हटले की, परवानाधारक दारू विक्रेत्या दुकानदारांना कोणता निर्णय घ्यायचा हे समजत नाहीये. कन्हैया लाल मौर्य यांनी सांगितले की, दारूची दुकाने खुली करण्यासाठी सरकारने परवानगी देण्याची मागणी करत आहोत. दारूची दुकाने बंद असल्याकारणामुळे दररोज 100 कोटी रूपयांचे नुकसान होत आहे.

मद्य विक्री वेल्फेअर असोसिएशन उत्तरप्रदेशचे महामंत्री यांनी म्हटले की,दारूची दुकाने खुली करण्याची परवानगी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री,अबकारी सचिव आणि अबकारी आयुक्त यांना पत्र लिहिले आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत,तसेच काही राज्यांनी दारूला अत्यावश्यक सेवेत सामिल केले आहे.त्यामुळे काही राज्यात दारू विक्रीस परवानगी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या