‘तुकडे तुकडे गँग’वर बसणार चाप, देशविरोधी घोषणा दिल्यास विद्यापिठावर कारवाई

20

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी एका नवीन अध्यादेशाचा मसुदा तयार केला आहे आणि लवकरच तो मंजूर करण्यात येईल. या कायद्यांतर्गत राज्यातील 27 नवीन आणि जुन्या खासगी विद्यापिठांना आदेश देण्यात येणार की, विद्यापीठ परिसरात देशविरोधी कार्यक्रम होऊ देऊ नका. तसे झाल्यास नवीन कायद्याद्वारे विद्यापिठावर कारवाई करण्यात येईल. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

‘उत्तर प्रदेश प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ऑर्डिनेन्स 2019’ असे या नवीन अध्यादेशाचे नाव आहे. या कायद्यांतर्गत कोणत्याही विद्यापिठात राष्ट्रविरोधी गोष्टी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. यासंबंधी उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक एकात्मता, आंतरराष्ट्रीय सद्भाव, देशभक्तीच्या वृद्धीसाठी हा कायदा समर्पित असेल. तसेच सर्व संस्थांना नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यापिठाला विद्यापीठ परिसरात कोणताही राष्ट्रविरोधी प्रकास सुरू नसल्याचे सरकारला सांगावे लागेल. तसेच अशा प्रकारचे कोणतेही कृत्य विद्यापीठ परिसरात किंवा विद्यापिठाच्या नावाने सुरू नाही, हे लिखित स्वरुपात द्यावे लागणार आहे.

बिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कॅबिनेटने ‘उत्तर प्रदेश प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ऑर्डिनेन्स 2019’ पास केले आहे. याअंतर्गत राज्यातील 27 खासगी विद्यापीठ एका छताखाली येतील. तसेच नवीन आदेशाचे पालन करण्यासाठी जुन्या विद्यापिठांना एक वर्षाचा अवधी देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या