पत्नीने च्युईंगम घेण्यास दिला नकार, पतीने कोर्टातच दिला तिहेरी तलाक

517

सामना ऑनलाईन । लखनौ

तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्यात आल्यानंतरही काहीजण अजूनही याच पद्धतीचा वापर करत काडीमोड करत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये सिव्हील कोर्ट परिसरात एकाने पत्नीला च्युईंगम देण्याचा प्रयत्न केला. पण तिने नकार दिल्याने पतीने चिडून तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणत तिला तलाक दिल्याचे समोर आले आहे. याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सिम्मी(30) असे महिलेचे नाव आहे. तर सईद राशिद असे तिच्या पतीचे नाव आहे.

सिम्मी आणि सईद यांचा निकाह 2004 साली झाला होता. पण लग्नानंतर पती व सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. यामुळे सिम्मीने पती व सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सोमवारी याप्रकरणाची सुनावणी असल्याने सईद कोर्टात आला होता. त्यावेळी सिम्मी आपल्या वकिलाबरोबर बोलत असताना सईदने तिला च्युईंगम देऊ केले. पण सिम्मीने त्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या सईदने तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणत तिला कोर्ट परिसरातच सोडचिठ्ठी दिली व तो निघून गेला. तिहेरी तलाक रद्द झाल्यानंतरही पतीने सोडचिठ्ठी दिल्याने सिम्मी अधिकच चवताळली . तिने पुन्हा पोलिसात धाव घेत सईदविरोधात तक्रार दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या