जीव वाचवायला तोंडात पाईप घातला, स्फोटात महिलेचा मृत्यू

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेच्या तोंडात स्फोट झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेने सल्फ्युरिक अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

अलिगढमध्ये राहणाऱ्या या महिलेने बुधवारी रात्री सल्फ्यरिक अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या नातेवाईकांनी तत्काळ तिला जेएन मेडीकल रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिच्या पोटातील अॅसिड बाहेर काढण्यासाठी सक्शन पाईप तोंडात टाकला. जसा सक्शन पाईप सुरू केला. त्यातील ऑक्सिजन तोंडातील सल्फ्युरिक अॅसिडच्या संपर्कात आले व त्याचा स्फोट झाला. ही घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या स्फोटामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.