दुसरीही मुलगी झाल्याने पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक

372

देशभरात तिहेरी तलाक विरोधात कायदा करण्यात आला असतानाही काहीजण अजूनही याच प्रथेचा वापर करत पत्नीला सोडचिठ्टी देत असल्याचे समोर आले आहे. पत्नीला दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने पतीने तीन वेळा तलाक बोलत तिला सोडले. जाफरीन अंजुम असे महिलेचे नाव आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील हैदर गंज तालुक्यात ही घटना घडली आहे.

जाफरीनने 18 ऑगस्ट रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. यामुळे दुसऱ्यांदा मुलगा होईल असे स्वप्न बघणाऱ्या तिच्या पतीचा हिरेमोड झाला. त्यातूनच त्याने जाफरीनला तिहेरी तलाक दिला. यामुळे हादरलेल्या जाफरीनने पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी निकाहच्या महिन्याभरानंतर पतीने आपला हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोपही तिने तक्रारीत केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करत असून अद्याप पतीला अटक करण्यात आलेली नाही असे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या