पोलिसांच्या जीवनावर आधारित ‘अर्धसत्य’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

71

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी रंगभूमीवर विविध विषय हाताळले गेल आहेत आणि नाटकांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटांप्रमाणेच मराठी नाटकांचेही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्याचा नवा ट्रेंड चित्रपटसृष्टीत रुजत आहे. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडियावर आपल्या आगामी नाटकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. चित्रपटांच्या आपल्या कणखर अभिनयाने मराठी रंगभूमी ही गाजवणारे डॉ. अमोल कोल्हे आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर एका नव्या नाटकाच्या माध्यमातून अवतरणार आहेत.

शार्गी प्रॉडक्शन निर्मित ‘अर्धसत्य’ हे नवंकोरं नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. प्रसाद दाणी लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘अर्धसत्य’ या नाटकाची निर्मिती मुकेश शिपुरकर यांनी केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि त्यांच्यासह प्रसाद दाणी, दीपक करंजीकर, गौरीश शिपुरकर आणि सरिता मेहेंदळे यांच्या देखील भूमिका आहेत.  डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘अर्धसत्य’ नाटकाचा फर्स्ट लूक त्यांच्या सोशल मीडियावरून प्रदर्शित केला आहे. या नाटकाचा विषय नक्की काय आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल..

पाहा अर्धसत्य या नाटकाचा फर्स्ट लूक-

आपली प्रतिक्रिया द्या