निपुण धर्माधिकारीचा ‘बापजन्म’ येतोय!

सामना ऑनलाईन । मुंबई

आजचा मराठी तरुणाईला निपुण धर्माधिकारी हे नाव तसं नवीन नाही. भाडिपाच्या कास्टिंग काऊच या वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेला निपुण एक घराघरात पोहोचला आहे. निपुण एक अतिशय चांगला दिग्दर्शकही आहे. वेबसीरिजमध्ये काम केल्यानंतर तो आता आगामी ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, सुमतिलाल शाह व ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्स’तर्फे या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, आयडियाची कल्पना, तुकाराम, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही अशा अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारी एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट ही संस्था ‘बापजन्म’ हा अजून एक चित्रपट घेऊन येत आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘बापजन्म’ प्रदर्शित होत आहे.