स्वप्ना आणि सुबोध का म्हणताहेत ‘तुला कळणार नाही’?

44

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपटसृष्टी ही विषय आणि आशय यांच्या बाबतीत अधिक संपन्न होत चालली आहे. आशयघन चित्रपट आणि उच्च निर्मितीमूल्य या गोष्टींसाठी सर्वत्र मराठी मनोरंजनसृष्टीची वाहवा सुद्धा होत आहे. तसेच आपल्या सिनेसृष्टीत येणाऱ्या आगामी चित्रपटांची नावं पाहूनही निर्माता-दिग्दर्शकांच्या मनातल्या भन्नाट आयडियांची कल्पना येते.

स्वप्ना वाघमारे जोशी यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून त्यांनी नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मितवा’ या चित्रपटांतून प्रेमाची आणि मैत्रीची नवी परिभाषा मांडली, ‘लाल इश्क’च्या माध्यमातून रहस्यमय मनोरंजन केलं, ‘फुगे’ मध्ये तर सुबोध भावे आणि स्वप्नील जोशीची भन्नाट केमिस्ट्री दाखवली. आता लवकरच त्यांचा ‘तुला कळणार नाही’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

नुकतंच ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटाच्या नावाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिनेकॉर्न इंडिया यांच्या सहकार्याने, सक्षम फिल्म्स आणि जीसीम्स प्रस्तुत ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी याने केली आहे. तसेच श्रेया योगेश कदम, अर्जुन सिंघ बरन आणि कार्तिक निशानदार हे सुद्धा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर निरव शाह, ईलाची नागदा आणि जयेश मुजुमदार हे सह-निर्माते आहेत. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असून ८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पाहा हे मोशन पोस्टर-

आपली प्रतिक्रिया द्या