पोलिसांवर आधारित ‘लाल बत्ती’चा मुहूर्त संपन्न

सामना ऑनलाईन । मुंबई

‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीद स्वीकारून पोलीस यंत्रणा समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटत असते. या पोलीस यंत्रणेच्या चुका शोधण्यातच धन्यता मानणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा ‘लाल बत्ती’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

साई सिनेमा प्रस्तुत, संतोष सोनावडेकर निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘लाल बत्ती’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. पोलिसांच्या माणुसकीची गोष्ट सांगणाऱ्या ‘लाल बत्ती’ या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, राधा कुलकर्णी, अनिल गवस, जयेंद्र मोरे, प्रशांत मोहिते, प्रदीप घुले, शैलेश धनावडे, तेजस एस., सुरेश चौधरी आदी कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत.

साई सिनेमा प्रस्तुत ‘लाल बत्ती’ या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली असून दिग्दर्शन गिरीश मोहिते करत आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवादलेखन केले आहे. चित्रपटाचं छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाला अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभणार आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर हे करत असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. लवकरच ‘लाल बत्ती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या