बाहुबली प्रभासच्या आगामी साहोचा टीझर रिलीज

16

सामना ऑनलाईन । मुंबई

बाहुबली’मधून संपूर्ण देशाच्या गळ्यातला ताईत झालेला अभिनेता प्रभास याच्या आगामी चित्रपटाचा टीजर ‘बाहुबली २’च्या प्रदर्शनादिवशीच रिलीज झाला आहे. ‘साहो’ असं या चित्रपटाचं नाव असून हा टीजर एकाच वेळी हिंदी, तेलुगू व तामीळ अशा तीन भाषांमध्ये झळकला आहे. ‘बाहुबली’मध्ये प्रभासनं साकारलेल्या भूमिकेमुळं या चित्रपटाविषयीही प्रचंड उत्सुकता असून चित्ररसिकांच्या या टीझरवर उड्या पडत आहेत.

टीजरवरून हा चित्रपट रहस्यपट असल्याचं दिसत आहे. ‘बाहुबली २: द कन्क्लुजन’सोबत हा टीजर प्रसिद्ध झाल्यानं ‘साहो’चे निर्माते प्रचंड खूष आहेत. आमच्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय सिनेजगतातील सर्वात भव्य चित्रपटासोबत ‘साहो’चा टीजर प्रसिद्ध झाल्याने आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे,’ असं त्यांनी सांगितलं. ‘साहो’चं बजेट १५० कोटींचं आहे. सुजित दिग्दर्शित या चित्रपटाला शंकर-एहसान लॉय यांनी संगीत दिलंय. अॅक्शन दृश्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात येत असल्याचं सुजित यांनी नुकतंच सांगितलं. या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही सुजित म्हणाले.

पाहा साहोचा टीझर-

आपली प्रतिक्रिया द्या