दमदार Royal Enfield 650 cc cruiser बाईक येतेय, जबरदस्त इंजिनसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स…

लोकप्रिय दुचाकी उत्पादन कंपनी रॉयल एनफील्ड लवकरच हिंदुस्थानात आपल्या नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. meteor 350 आणि नवीन पिढीची classic 350 नंतर आता कंपनी बाजारात आपली नवीन Royal Enfield 650 cc cruiser बाईक लॉन्च करू शकते. कंपनी या बाईकची टेस्टिंग सुरू केली आहे. हिंदुस्थानात ही बाईक kawasaki vulcan ला टक्कर देणार आहे.

मिलानच्या आगामी EICMA 2021 ऑटो एक्स्पोमध्ये 650 cc cruiser बाईक सादर करू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 650 ट्विन्स (कॉन्टिनेंटल GT650 आणि इंटरसेप्टर 650) सारख्या इंजिन प्लॅटफॉर्मवर ही बाईक तयार केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीने नुकतीच आपली बेस्ट सेलिंग बाईक classic 350 नवीन अवतारात लॉन्च केली आहे.

कंपनी आपल्या या आगामी बाईकचे नाव ‘शॉर्टगन 650’ असेही ठेवू शकते. कारण कंपनीने आधीच हे नाव रजिस्टर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या बाईकला कंपनी ‘super meteor’ नाव देखील देऊ शकते. हे नाव कंपनीसाठी नवीन नाही आहे, कारण कंपनीने 1970 साली देखील आपल्या एका बाईकचे हे नाव ठेवले होते. दरम्यान, या बाईकबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. तसेच याच्या लॉन्चिंगबद्दलही कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.