मुक्ताच्या व्हिडिओमागचं रहस्य उलगडलं…

सामना ऑनलाईन । मुंबई

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ”एक तर मी तुरुंगात आहे , मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय … पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं .. मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं..” या आशयाचा एक व्हिडिओ फेसबुकवर अपलोड झाला होता. या व्हिडिओत मुक्ता खूप घाबरलेली दिसत होती. तिच्या कपाळावर रक्तही दिसत होतं.

हा व्हिडिओ नेमका कोणत्या कारणाने अपलोड केला गेला असावा, याची चर्चा रंगलेली असतानाच या प्रश्नाचा उलगडा झाला आहे. हा व्हिडिओ मुक्ताच्या आगामी मालिकेचा असून तब्बल पाच वर्षांनी मुक्ता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ७ ऑगस्टपासून ‘झी युवा’ या वाहिनीवर ‘रुद्रम’ नावाच्या मालिकेत मुक्ता दिसणार आहे. ही बातमी स्वतः मुक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. पण, ही मालिका नेमकी कशावर आधारित आहे, मुक्तासोबत या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार असणार आहेत, याचा उलगडा मात्र अजूनही झालेला नाही.

#ZeeYuva वरील #Rudram या नवीन मालिकेतल्या माझ्या भूमिकेशी ओळख करून देण्यासाठी मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला… तुमच्या reactions वरुन तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा कळलं, हे प्रेम असंच राहुद्या…. घेऊन येतेय माझी नवीन मालिका #Rudram 7 ऑगस्टपासून, सोम-शुक्र रात्री 9.30 वा. फक्त #ZeeYuva वर…

A post shared by mukta (@muktabarve) on

आपली प्रतिक्रिया द्या