यूपीएससीत यश मिळवणाऱया सौंदर्यवतीची इन्स्टाग्रामवर 16 बोगस प्रोफाईल्स

ऐश्वर्या श्योरानचं नाव हिंदुस्थानातील सध्याच्या घडीची एक नावाजलेली मॉडेल आहे. तिने मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती. मॉडेलिंगच्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या ऐश्वर्याने आता अभ्यासतही कमाल केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात 93 वा रँक मिळवणारी ऐश्वर्या शिओरान हिची 16 बोगस प्रोफाईल्स इन्स्टाग्रामवर आढळली आहेत. अज्ञात व्यक्तीने ती बनवली असून त्यासंदर्भात ऐश्वर्याने कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इन्स्टाग्रामवर ही प्रोफाईल्स पाहून ऐश्वर्याला धक्काच बसला. त्या प्रोफाईल्समध्ये तिची छायाचित्रे आणि माहितीही देण्यात आली होती. इन्स्टाग्रामवर आपण अद्याप एकही प्रोफाईल बनवलेले नाही असे तिचे म्हणणे आहे. पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ऐश्वर्या हिने 2016 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला होता आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तिचे वडिल लष्करात कर्नल असून 2017 पासून ती कुलाबा येथील लष्करी अधिकाऱयांच्या वसाहतीमध्ये राहते.

आपली प्रतिक्रिया द्या