ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टची सेवा सुरू; या वस्तूंची होत आहे सर्वाधिक मागणी

3233

ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टने आज देशभरातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आवश्यक वस्तूंची डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू होताच ग्राहकांनीही आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. ॲमेझॉन फ्लिपकार्टने आजपासून गारमेंट्स, स्मार्टफोन, मोबाईल ॲक्सेसरीज आणि इतर आवश्यक वस्तूंची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. यामुळे सुमारे चाळीस दिवसांनंतर शेकडो लघुउद्योग व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचे चक्र फिरण्यास सुरुवात होणार आहे.

या गोष्टींची होत आहे सर्वाधिक मागणी

ई-कॉमर्स कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-शर्ट, बरमूडा, अंडरगारमेंट्स सर्वाधिक सर्च आणि ऑर्डर केले जात आहेत. सौंदर्य उत्पादनांमध्ये हेअर रिमूव्हर क्रीम, केस कात्री, ट्रिमर आणि घरगुती वस्तू मच्छर रॅकेट्स, डासांच्या जाळ्या, एलईडी बल्ब, प्रेशर कुकर, पाण्याच्या बाटल्या, बेडशीट आणि टॉवेल्स यासारख्या वस्तू ऑर्डर केल्या जात आहेत. यासोबतच मोबाइल फोन चार्जर, इयरफोन, डेटा केबल्ससारख्या गोष्टींनाही बरीच मागणी आहे.

याबाबत बोलताना फ्लिपकार्ट ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे प्रमुख रजनीश कुमार यांनी सांगितले की, ‘आम्ही देशातील दहा लाखाहून अधिक एमएसएमई आणि विक्रेत्यांशी संपर्क साधत आहोत. जे ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तू पुरवण्यास मदत करत आहेत. पुन्हा विक्री सुरू करण्यासाठी विक्रेत्यांना ऑनलाईन सल्लेही देण्यात येत आहेत.’ तसेच याबाबत बोलताना गारमेंट कंपन्यांनी सांगितले की, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी सुरू झाल्याने त्यांचं दहा टक्के उत्पादन सुरू होऊ शकतं आणि तयार माल विकण्यास मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या