उरण – 18 व्या अखिल भारतीय आगरी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

320

भेंडखळ-उरण येथे शनिवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय 18 व्या अखिल भारतीय आगरी साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.

आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने आयोजित संमेलनाप्रसंगी संमेलनाध्यक्ष हरिभाऊ घरत, कार्याध्यक्ष चंद्रकांत मढवी, प्रकाश ठाकूर, संस्थाध्यक्ष मोहन भोईर, संमेलन प्रमुख पुंडलिक म्हात्रे,बोकडवीरा सरपंच मानसी पाटील, धनंजय गोंधळी, दा.चां. कडू आणि मान्यवर,नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती. या ग्रंथ दिंडी त साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या