प्रियंका रेड्डी प्रकरणातील नराधमांना फाशी द्या; महिलांची मागणी

440

देशभर गाजलेल्या निर्भया प्रकरणानंतर हैदराबाद येथे डाॅ.प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून तिला जाळण्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेचा निषेध करुन आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोमवारी उरण येथील महिलांनी जाहीर निषेध सभेतून केली आहे. उरणच्या गांधी चौकात सोमवार महिलांनी निषेध सभा आयोजित केली होती. हेमलता पाटील, नहिदा, सिमा घरत, ज्योती म्हात्रे, सारिका कडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित निषेध सभेसाठी परिसरातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी निदर्शने करत ही मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या