उरणच्या महिलांसाठी अबोली रिक्षा प्रशिक्षण

414

प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वानं त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. अशातच घराबाहेर पडून काम करण्याची इच्छा असलेल्या उरण तालुक्यातील महिलांसाठी निर्भिड संस्थेच्यावतीने प्रथमच अबोली रिक्षा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

यावेळी निर्भिड संस्थेच्या माध्यमातून संस्थापिका अध्यक्षा रुचिता मलबारी यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त गरजू महिलांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. यावेळी उरण नागावचे सरपंच अनंत घरत, चिरनेर गावचे सदस्य रमेश फोफेरकर, उरण मनसेचे संदेश ठाकूर, श्री एकविरा मोटार ट्रेनिंग स्कुलचे मालक व घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सुमित्रा जाधव, सुचित्रा तोगरे,एस. आर. तोगरे,दिनेश हळदणकर,ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते ‌.

आपली प्रतिक्रिया द्या