उरणची ‘दंगल गर्ल’ अमेघा घरतने मिळवले कुस्तीमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक

243

उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उरणची ‘दंगल गर्ल’ अमेघा घरत हिने 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले आहे. मलेशिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ती आता हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. उरण तालुक्यातील खोपटे गावच्या अमेघा अरुण घरत या महिला कुस्तीपट्टूने उत्तराखंड येथे 17 आणि 18 ऑगस्ट रोजी झालेल्या  राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली असून तिने 55 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले आहे.

सुवर्णपदक पटकावणाऱ्या अमेघा घरत हिला आता मलेशिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून अशी कामगिरी करणारी ती उरण तालुक्यातील एकमेव महिला क्रीडापटू ठरली आहे. देशाला कुस्ती स्पर्धेत ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा निर्धार अमेघाने व्यक्त केला आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या