शबाना आझमींविषयी ट्वीट केल्याने उर्वशी रौतेला ट्रोल

2203

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. त्याच्यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देतात. पण, नुकतंच एका ट्वीटमुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. उर्वशी ही ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींविषयी ट्वीट केल्याने ट्रोल झाली आहे.

शबाना आझमी यांचा शनिवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या अपघाताचं वृत्त व्हायरल होताच त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत त्यांच्या स्वास्थ्यासाठी कामना करणारी अनेक ट्वीट केली गेली. त्यात उर्वशीही एक होती. तिनेही त्यांच्या अपघाताविषयी हळहळ व्यक्त करत त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कामन केली. खरंतर ते एक साधं ट्वीट होतं. पण, त्याचा मजकूर हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटसारखाच होता.

त्यामुळे नेटकऱ्यांनी यावरून तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. काही जणांनी तिला अशिक्षित देखील म्हटलं. तर काहींनी बॉलिवूडकर ट्वीट आणि चित्रपटांच्या संहिता या दोघांमध्ये नक्कल करणं सोडत नाहीत, अशी टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या