आश्चर्यच! ‘या’ तरुणीला आहेत दोन प्रायव्हेट पार्ट आणि दोन गर्भाशय

निसर्ग नियमानुसार सामान्यत: प्रत्येक पुरुषाला एकच लिंग आणि महिलांना एकच योनी व गर्भाशय असते. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या पेग डीएंजेलो (Paige DeAngelo) नावाच्या 20 वर्षीय तरुणीच्या शरीरात दोन प्रायव्हेट पार्ट आणि दोन गर्भाशय आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील ही अत्यंत दुर्मीळ घटना असून यासह जीवन जगणे खूपच आव्हानात्मक असल्याचे पेग म्हणते.

अमेरिकेतील पेनसिल्वेनियातील फिलाडेल्फिया येथे पेग राहते. तिच्या शरीरात दोन प्रजनन प्रणाली आहेत. वैद्यकीय भाषेमध्ये यास युट्रेस डिडेलफिस ((Uterus Didelphys) असे म्हणतात. या अर्थ एखाद्या महिलेच्या शरीरात दोन योनी, दोन गर्भाशय आणि दोन गर्भाशय ग्रीवा असणे असे होय. याबाबत ‘डेली मेल’ने वृत्त दिले आहे.

paige-deangelo-1

वृत्तानुसार, दोन योनी आणि दोन गर्भाशयासह जगणे खूपच कठीण असून यामुळे पेगला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तिला महिन्यातून दोन वेळा पाळी (पीरिएड्स) येतात. तिच्या दोन्ही प्रजनन प्रणाली योग्य पद्धतीने काम करत असून भविष्यात ती दोन्ही गर्भाशयांमध्ये गर्भ धारण करू शकते.

paige-deangelo-2

पेगला 18 वर्षाची होईपर्यंत आपल्या या शारिरीक अवस्थेची माहितीच नव्हती. दोन वर्षांपूर्वी अनियमीत पाळीमुळे ती स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेली होती, त्यावेळी हा खुलासा झाला.

paige-deangelo-3

दरम्यान, मला दोन योनी आणि दोन गर्भाशय आहेत असे मी कोणाला सांगितले की लोक माझ्याकडे आश्चर्याने बघतात. अनेकांना वाटते की दोन्ही योनी शरीराच्या बाहेरच्या बाजूने दिसतात, मत्र तसे नसल्याचे पेन सांगते. कारण तसे असते तर मला 18 वर्षाची होईपर्यंत हे समजण्याची वाट पहावी लागली नसते. तसेच यामुळे माझ्या लैंगिक आयुष्यावर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचेही मला त्यांना समजून सांगावे लागते, असेही ती म्हणते.

आपली प्रतिक्रिया द्या