डोनाल्ड ट्रम्प यांना 14 कोटींचा दंड

551

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लोककल्याणासाठी जमा केलेली रक्कम 2016 साली निवडणूक प्रचारात वापरली असल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्यांना 14 कोटींचा दंड ठोठावला. ट्रम्प यांच्या ट्रम्प फाऊंडेशन या संस्थेतर्फे लोककल्याणाची कामे करण्यासाठी निधी गोळा केला जातो. या निधीचा गैरवापर झाल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.

न्यूयॉर्कचे न्यायाधीश सेलियन स्कारपुला यांनी हा दंड केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या ट्रम्प फाऊंडेशनचा निधी हा निवडणूक प्रचार, त्यांच्या कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी आणि त्यांची चित्रे खरेदी करण्यासाठी वापरल्याचे आढळल्यानंतर न्यायालयाने त्यांना दंड केला. न्यूयॉर्क ऍटर्नी जनरल यांच्या कार्यालयाद्वारे ट्रम्प यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. डोनाल्ड यांनी ट्रम्प फाऊंडेशनचा वापर निवडणूक प्रचारासाठी निधी गोळा करणे आणि खर्च करण्यासाठी केला आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला.

आपली प्रतिक्रिया द्या