अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये जाऊ नका, पर्यटकांना अमेरिकेचा इशारा

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन –

वाढत्या अतिरेकी कारवायांमुळे धोकादायक ठरलेल्या अफगानिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये जाऊ नका, असा स्पष्ट इशारा अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिला आहे. हिंदुस्थानही अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षित नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वतीने पर्यटकांना सल्ला देणारे एक पत्रक जारी करण्यात आले आहे. दक्षिण आशियातील अतिरेकी संघटनांच्या निशाण्यांवर अमेरिकन नागरिक, दुतावास, अमेरिकेशी संबंधित संस्था असल्याची माहीती गुप्तचर संघटनेने दिली असल्याने अमेरिकन नागरिकांनी व पर्यटकांनी या देशांचा दौरा टाळावा, असा सल्ला या पत्रकान्वये दिला आहे.

अमेरिकन नागरिकांना सर्वाधिक धोका अफगानिस्तान आणि पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अफगानिस्तान या देशातील एकही भाग परदेशी नागरिकांसाठी सुरक्षित नाही. पाकिस्तानातील अनेक अतिरेकी गट, जहाल संघटना आणि कट्टरवाद्यांच्या रडारवर अमेरिकन नागरिक आहेत. बांग्लादेशात यापूर्वी अमेरिकन नागरिक, दुतावास आणि अमेरिकेन संस्थांवर अतिरेकी हल्ले झालेले आहेत. त्याची सविस्तर माहिती या पत्रकात देण्यात आली आहे. हिंदुस्थानात अमेरिकन नागरिकांवर जरी हल्ले झालेले नसले तरी धोका नाकारता येणार नसल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या