हिंदुस्थानींनी नोकऱ्या पळवल्या, अमेरिकेत वर्णद्वेषी प्रचार

29

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

अमेरिकेत वर्णद्वेषावरुन हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ला होण्याच्या घटना घडत असतानाच ओहायो येथे वर्णद्वेष आणि नोकाऱ्यांच्या चिंतेतून तयार करण्यात आलेल्या एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तेथील हिंदुस्थानी नागरिक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

‘सेव्ह अमेरिकन आयटी जॉब्स डॉट कॉम’ या संकेतस्थळावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात ओहायो येथील कोलंबस शहरात आनंदाने राहणारी हिंदुस्थानी कुटुंबे दाखवण्यात आली आहेत. ‘येथे येऊन श्रीमंत झालेल्या या हिंदुस्थानींनीच आपल्या नोकऱ्या पळवल्याचे या व्हिडिओत सांगण्यात आले आहे’. यानंतर ओहायो पोलिसांनी येथील हिंदुस्थानी कुटुंबांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

यूट्यूबवर हा व्हिडिओ आतापर्यंत ४१,००० हून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हर्जिनिया येथील स्टिव्ह पुशोर (६६) याने हा व्हिडिओ बनवल्याचे समोर आले आहे.

या व्हिडिओत ओहायोतील एका पार्कमध्ये हिंदुस्थानी महिला लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन आल्याचे दिसत आहे. काही मुले बाईकवर फिरत असल्याचेही यात दिसत आहे. या भागात अनेक हिंदुस्थानी स्थायिक झाले असून श्रीमंत झाले आहेत. यांनीच आपल्या नोकऱ्या पळवल्या असल्याच पुशोर या व्हिडिओत सांगत आहे. या भागात इतके हिंदुस्थानी आले आहेत की, यांनी हा भागच काबिज केल्याच दिसत आहे. यामुळे हा भाग मिनी मुंबईसारखा दिसत असल्याच पुशरने म्हटल आहे. याबरोबरच त्याने या संकेतस्थळावर ४०३ पानांचा मजकुरही टाकला आहे. यात हिंदुस्थानी म्हणजे ‘आयटी माफिया’ असून हिंदुस्थान म्हणजे नरकात जाण्याचा मार्ग अशा प्रकारचे वर्णद्वेषी संदेश त्याने पोस्ट केले आहेत.

पुशरचा हा व्हिडिओ आणि मजकुर व्हॉटसअपवरही फिरत असून अनेकांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या