अजगर नाकाला चावला, पण ती थोडक्यात वाचली

134
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

भगवान शंकराच्या गळ्यातला नाग पाहून अनेक सर्प मित्र त्या पद्धतीने आपल्या गळ्यात साप धरतात. पण तुमच्या अंगावर असा नाग-साप-अजगर आला तर? भितीनं घाबरयला होईल. मात्र अमेरिकेत एका महिलेलनं धाडस दाखवत स्वत:चा जीव सापाच्या तावडीतून सोडवला.

ओहायोमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या महिलेने अनेक साप वाचवले होते. त्यामध्येच एक बोआ कंस्ट्रिकटर हा ब्राझिलचा अजगर होता. त्याने अचानक महिलेवर हल्ला केला. तिच्या कमरेला त्याने वेटोळे घातले होते आणि हळूहळू तो तिच्या नाकापर्यंत जाऊन पोहोचला. तिला हलता देखील येत नव्हते मात्र तशा स्थिती देखील तिने कंट्रोल रुमला फोन लावला आणि माहिती दिली. ‘मला अजगरानं वेढलं असून जराही हलता येणार नाही. मला वाचवा’. पुढल्या अवघ्या ४ मिनिटात मदतसाठी बचाव पथक तेथे दाखल झालं. त्यांनी पाहिलं की अजगर त्या महिलेच्या नाकाला चावत आहे. तिला शरीरावर जखमा झाल्या असून ती रक्ताने माखली आहे. त्या पथकाने तात्काळ अजगराचे तोंड कापले आणि त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या